उत्तराखंड म्हणजेच देवभूमी!

By | July 1, 2016

उत्तराखंड म्हणजेच देवभूमी!

अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असा भारतातला भूभाग म्हणजे उत्तराखंड. हिमालयाच्या पायथ्याशी असणारे हे राज्य म्हणजे भारतातला स्वर्गच जणू. पूर्वी उत्तराखंडला उत्तरांचल असे म्हणाले जात, हे राज्य निर्माण झाले ९ नोव्हेंबर २००० – तो पर्यंत हा भूभागातील काही ठिकाणे वगळली तर इतरत्र ठिकाणे दुर्लक्षितच होती. पण आता राज्य झाल्यापासून खुपश्या सुधारणा झाल्या आहेत. उत्तराखंडाची एक सीमा म्हणजे तिबेट आणि दुसरी सीमा म्हणजे चीन. उत्तराखंड राज्य दोन भूभागांमध्ये विभागणी केलेला आहे, एक म्हणजे गडवाल आणि दुसरा भाग म्हणजे कुमाव व दोन्ही मध्ये मिळून १३ जिल्हे आहेत.

उत्तराखंड हिमालयाच्या सानिध्यात असल्यामुळे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठीकांनानी भरलेला आहे. उत्तराखंड मधेच गंगोत्री, यमुनोत्री (गंगेचे आणि यमुनेचे उगम स्थान) आहे जिथे दर वर्षी लाखो भाविक जातात. बद्रीनाथ (विष्णू) आणि केदारनाथ (शिव) ही दोन्ही ठिकाणे मिळून छोटा चारधाम ही यात्रा देखील होते, बद्रीनाथ आणि केदारनाथला देखील लाखो भाविक दरवर्षी भेट देतात. हरिद्वार म्हणजेच देवांकडे, स्वर्गाचे द्वार हे देखील उत्तराखंड मधेच आहे, रीशिकेश हे अतिशय महत्वाचे योग साधनेचे ठिकाण देखील जवळच आहे. उत्तरखंड मध्ये एकूण १२ राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये आहेत जे राज्याच्या १३.८ टक्के भूभागावर पसरलेले आहे. आणि गम्मत म्हणजे ही अभ्याआरण्ये समुद्रापातळी पासून ८०० मीटर ते ५४०० मीटर इतक्या उंचीवर आहेत. त्यातले सगळ्यात जिम कोर्बेट अभयारण्य खूप प्रसिद्ध आहे.

उत्तराखंड म्हणजे हिल स्टेशन्स ने भरलेले राज्य – त्यात नैनिताल, मसुरी, धनौलटी, लान्सदोव्न, पाऔरी, सत्ताल, अल्मोरा, कौसानी, भीमताल, रानीखेत ही अतिशय लोकप्रिय ठिकाणे. कुमाव भागातले कौसानी म्हणजे भारताचा स्वित्झरलंड असेच म्हणाले जाते. कौसानीतून समोर उत्तंग हिमालयातली शिखरे आपल्याला साद घालत असतात. सूर्योदय काळी जेव्हा सूर्याची किरणे हिमालयीन शिखरांवर पडतात तेव्हा संपूर्ण हिमालय अक्षरशः सोनेरी दिसतो, जणू काही सोन्याचेच डोंगर समोर आहेत असा भास होतो.

इथे कौसानी मधेच महात्मा गांधी जेंव्हा आले होते, तेव्हा ते ह्या निसर्गरम्य परिसरात रुळले आणि त्यांनीच कौसानी म्हणजे भारताचा स्वित्झरलंड अशी उपमा दिली, जिथे महात्मा गांधी राहिले होते तिथे आता अनासक्ती आश्रम आहे. तिथून देखील आपल्याला हिमालयन शिखरे पहालायला मिळतात. ट्रेकिंगची आवड असण्यायांची तर मौजच – चामोली, नंदा गुमटी, औली, जोशीमठ, चाक्राता, चोपता, हेमकुंड साहिब अशी अनेक ठिकाणे आहेत.

 

Valley of Flowers

Valley of Flowers – Near Joshimath – Uttarakhand – “पुष्पावती”

 

उत्तराखंड मधले अजून एक अद्भुत ठिकाण म्हणजे व्ह्याली ऑफ फ्लॉवर्स (फुलांची दरी), ज्याचे पूर्वी नाव होते “पुष्पवती”. ही अख्खी दरीच निरनिराळ्या फुलांनी भरलेली असते. इथे बर्याचश्या दुर्गम वनस्पती देखील सापडतात ज्या फक्त हिमालयात उगवतात. ही पुष्पवती म्हणजे फोटोग्राफर्स करता स्वर्ग! ही दरी जोशीमठ (गढवाल) जवळ आहे.

मग येताय आमच्याबरोबर निसर्गरम्य उत्तराखंडचा आनंद लुटायला? उत्तराखंडला भेट देण्यासाठी सद्गुरू परिवार आणि इझीटूर्स तर्फे सप्टेंबर पासून यात्रा आयोजित करण्यात येत आहेत, साधारण ८ दिवसाच्या, अत्यंत माफक दर आणि उत्तम नियोजन असलेल्या ह्या सहलींची नोंदणी प्रक्रिया चालू आहे. त्वरित संपर्क करावा: जनसंवाद, सद्गुरू परिवार, इझीटूर्स: +91-9764297684