एक संवाद

By | March 14, 2015

एक संवाद,

स्थळ: हनुमान टेकडी, पुणे, आज, निमित्त मोर्निंग वाक

शब्बीर: “का भाऊ मुसलमान माणसांबद्दल एवढा प्रोब्लेम? आता तर आरक्षण पण काढून घेतलं”

रोहन: कुठे प्रोब्लेम? मला का बर प्रोब्लेम असावा? प्रोब्लेम मला मुसलमान समाजाबद्दल नाहीये, प्रोब्लेम मला त्या हलकट राजकीय पक्षांशी आहे जे आप आपल्या सवडी आणि दमडीनुसार मुसलमान माणसाला वापरून घेतात. कॉंग्रेस पासून MIM पर्यंत. मजहब मजहब करून मते खेचायची आणि जातीय तणाव निर्माण करायचा. हमको मुसलमानो को सशक्त करना है – हि थाप प्रत्येक पार्टी देते. आरक्षण देऊन जर सशक्त होणार असेल तर ६० वर्षात बर्याच गोष्टी बद्दल्ल्या असत्या नाही का?

आम्ही बरे, अनआरक्षित, कुठेहि राखीव जागा नाही .. कॉलेज, नोकरी, धंदा, यशस्वी होण्यासाठी .. घाम गळायला लागतो, झक मारत का होईना अभ्यास करावाच लागतो. आज ह्यातल्या कुठल्या गोष्टी मुसलमान माणूस करू शकत नाही का?

शेवटी एक लक्षात ठेवा सर; एक फार हुशार माणूस बोलून गेला:

“You can be deprived of your money, your job and your home by someone else, but remember that no one can ever take away your honor.”

शब्बीर: हा जनाब .. बात मे दम है!

मी: < स्पिच्लेस >

—————————————————————————————-
आरक्षण – सर्व प्रकारचे – रद्द करायची वेळ आलीये, ठेवायचच असेल तर जात,
धर्म ह्या वर आधारित नसून फक्त आर्थिक परिस्तिथी वर आरक्षण ठेवावं.
———————————————————————————-