गुरुदेव दत्त – आरती

By | July 4, 2016

श्री गुरुदेव दत्त – आरती

 

दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’, याची अनुभूती देणारा ! प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव आहे’, हेच सत्य आहे. त्याच्याविना आपले अस्तित्वच नाही. आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. जो अहम भाव धुतो तो म्हणजेच अवधूत. दत्त गुरु म्हणजेच विश्वगुरु, पहिले गुरु – त्रिमूर्ती ज्यांच्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांचे अंश आहेत. आपल्या श्री गुरुदेव दत्त महाराजांची आरती – ही गुरुदेव दत्त आरती महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे, ह्या गुरुदेव दत्त आरतीचे मूळ लेखक माहिती नाहीत.

 

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त
अभाग्यासी कैसी न कळे ही मात
पराही परतली तेथे कैचा हा हेत
जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥

दत्त येऊनिया उभा ठाकला
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मी तू पणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥४॥

 

श्री गुरुदेव दत्त – आरती