जागेश्वर

By | July 1, 2016

जागेश्वर

 

jageshwar

jageshwar

उत्तराखंड मधले अजून एक प्रसिद्ध आणि जागृत स्थान म्हणजे “जागेश्वर”. जागेश्वर हे नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे घर मानले जाते. अशी मान्यता आहे कि ही देवळे चांद राजवंशाने बांधली होती आणि पुढे जाऊन आदी शंकराचार्यांनी जीर्णोद्धार केला. ह्या जागेश्वाराच्या आवारात एकंदरीत १२४ छोटी मोठी देवळे आहेत. विशेष म्हणजे ह्याची बांधणी अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे. जागेश्वर उत्तराखंड मधल्या अलमोडा जिल्ह्यात आहे आणि सध्या अर्कीय्लोजीकल सर्वे ऑफ इंडिया ह्या आवाराची निगा राखते.

ह्या आवारात दंडेश्वर, चंडीका, जागेश्वर, कुबेर, मृतुंजय, नव दुर्गा, नंदा देवी, सूर्य अश्या अनेक देव देवतांची मंदिरे आहेत. जागेश्वर हे समुद्र पातळी पासून १८७० मीटर वर असून आजू बाजूला घनदाट देवदार झाडी आहे आणि बाजूनीच जटागंगा नदी वाहते. जवळच नंदिनी आणि सुरभी नदींचा संगम देखील अतिशय देखणा आहे.

जागेश्वाराच्या देवळाला दोन सशस्त्र द्वारपाल आपल्याला पहायला मिळतात, हे म्हणजे नंदी आणि स्कंदी. हे शिवालय चक्क पश्चिमेला तोंड करून आहे, आणि इथे शंकराची पूजा नागेश रुपात केली जाते. ह्या देवळात शिवलिंगाचे दोन भाग आहेत – एक मोठा जो कि शिव मानला जातो आणि एक छोटा जे म्हणजे पार्वतीचे स्वरूप मानले जाते. देवळात अखंड ज्योती तेवत ठेवलेली आहे आणि समोरच दीपचंद आणि त्रीपालचंद ह्या दोन चांद घराण्याच्या राज्यांचे अष्टधातुचे पुतळे देखील आहेत.

जागेश्वाराच्या आवारातच मृतुंजयाचे देखील देऊळ आहे, हे देवूळ आवारातले सर्वात मोठे आणि जुने देवूळ आहे. गम्मत म्हणजे हे शिवमंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे आणि इथे शिवाची पूजा रक्षणकर्ता “महामृत्युंजय” ह्या रुपात केली जाते. हे शिवलिंग अतिशय वेगळे ठरते कारण ह्याचा आकार डोळ्यासारखा दिसतो. आपण जो नेहमी महामृत्युंजय मंत्र ऐकतो तो म्हणजे:

ॐ हौ जूँ सः
ॐ भूर्भुवः स्वः
ॐ त्रयंबकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवधर्नम्
उर्वारूकमिव बन्धनान्मृत्यॊर्मुक्षीय मामृतात्
ॐ स्वः भुवः भूः ॐ
सः जूँ हौ ॐ

ह्या मंत्राच्या नियमित जपाने भय, भीती, आजारपण निघून जाते अशी मान्यता आहे.

जागेश्वर देवळाच्या वर साधारण २ कि मी पुढे एका पायवाटेने गेल्यावर आपल्याला कोट लिंग महादेवाचा देवळाचे अवशेष सापडतात. कोट लिंग महादेव हे जाट गंगा आणि साम गंगेच्या संगमावर स्थित आहे, स्थानीय लोकांच्या म्हणण्यानुसार शंकराने ही जागा स्वतः ध्यान करण्यासाठी निवडली होती. जागेश्वरचा हा संपूर्ण परिसरच अतिशय मनमोहक वाटतो, आजू बाजूला देवदार झाडांचे घनदाट जंगल, निरनिराळ्या पक्षांचे सुमधुर काव्यच आणि थंडगार वातावरण – हे सर्वच अनुभवायचे आहे? मग येताय आमच्याबरोबर निसर्गरम्य उत्तराखंडचा आनंद लुटायला? उत्तराखंडला भेट देण्यासाठी सद्गुरू परिवार आणि इझीटूर्स तर्फे सप्टेंबर पासून यात्रा आयोजित करण्यात येत आहेत, साधारण ८ दिवसाच्या, अत्यंत माफक दर आणि उत्तम नियोजन असलेल्या ह्या सहलींची नोंदणी प्रक्रिया चालू आहे. त्वरित संपर्क करावा: जनसंवाद, सद्गुरू परिवार, इझीटूर्स: +91-9764297684