देवलोक पातळभुवनेश्वर – DevLok Patal Bhuvaneshwar

By | June 29, 2016

देवभूमी उत्तराखंड
देवलोक पातळभुवनेश्वर

पातळभुवनेश्वर ही चुनखडीची गुफा आहे जी गांगोलीहाट (पिठोरागड जिल्हा, उत्तराखंड) पासून साधारण १४ किमी वर आहे. ह्या गुफेचे महत्व म्हणजे हिंदू धर्मातील ३३ कोटी देवांचे ते घर मानले जाते. ही गुफा साधारण ९० फुट खोल आणि १६० मीटर लांब अशी आहे. खाली उतरायला पायऱ्या आहेत आणि सोबत धरायला साखळी, तरी देखील आता पातळभुवनेश्वर गुफा मध्ये पूर्णपणे दिवे लावले आहेत, त्यामुळे आतमध्ये जाणे आणि पाहणे सोप्पे पडते.

पाण्याच्या प्रवाहाने बनलेल्या, पूर्ण नैसर्गिक रित्या तय्यार झालेल्या ह्या गुफा आदी शंकराचार्यांनी शोधून काढल्या. ह्याची मूळ स्कंद पुराणा प्रमाणे अशी कि त्रेता युगात राजा रितूपर्णा ह्यांने ह्या गुफा प्रथम पहिल्या आणि पुढे आदी शंकराचार्यांनी ह्या गुफेचा परत शोध लावला ११९१ मध्ये. ह्या गुफेला चार द्वार आहेत, रणद्वार, पापद्वार, धरमद्वार, मोक्षद्वार, ह्यातील पापद्वार रावणाचा मृत्यू नंतर बंद केले गेले, रणद्वार महाभारतानंतर बंद केले गेले आणि सध्या दोनच द्वार उघडे आहेत.

पातळभुवनेश्वर मध्ये काय पाहाल? खर तर पातळभुवनेश्वर ही एक गुफा नसून, अनेक गुफा आहेत, गुफेत गुफा, त्यात देखील अंतर गुफा अशी होश उडवून टाकणारी एक अद्भुत, अविस्मरणीय आणि नैसर्गिक किमयेने ओतपोत भरलेली जागा आहे. इथे शेषनागाचा फणा आपल्याला पाहायला मिळतो, इथेच साक्षात शिवशंकराच्या जटा आहेत ज्यातून गंगा बाहेर येते, हीच गंगा पुढे एका कुंडात जमा होते आणि त्याच बाजूला ३३ कोटी देव देखील विराजमान आहेत. ह्याच गुफेत ऐरावत (इंद्राचा हत्ती – ज्याला १००० पाय) त्याच्या पायांचे ठसे देखील येथेच आपल्याला पाहायला मिळतात. एका अंतर गुफेत पांडवांच्या मांडीत बसलेले साक्षात गणपती आपल्याला पाहायला मिळतात.

पातळभुवनेश्वरला अजून एक आजूबा म्हणजे कालिका माते ची जीभ पाहायला मिळते. साक्षात् शिवशंकराचे अस्तित्व आपल्याला येथे जाणवते, ह्याच गुफेत असंख्य शिवलिंग नैसर्गिक रित्या तैयार झाल्या आहेत – तक्षक आणि वासुकी देखिल आपल्याला पहायला मिळतात. आदि गणेश म्हणजे कमळाच्या आठ पाकळ्यांवर गणेशाची ती मूर्ती ज्याचे फक्त धड आहे पण शीर नाही हे देखील पाहायला मिळते. शिव आणि शक्ती जिथे पूजले जातात – अशी अगम्य लीला देखील पाहायला मिळते. असे बोलले जाते कि पातळभुवनेश्वरला भेट देणे म्हणजे चारधाम सारखी कठीण यात्रा पूर्ण करणे कारण ह्याच गुफेत चारी धामांच्या गुफेचा मार्ग देखील आहे.

पातळभुवनेश्वरला भेट देण्यासाठी सद्गुरू परिवार आणि इझीटूर्स तर्फे सप्टेंबर पासून यात्रा आयोजित करण्यात येत आहेत, ह्यात देवभूमी उत्तराखंड मधील अनेक स्थाने पाहायला मिळतील. अत्यंत निर्सर्गरम्य असा हा परिसर आहे ज्यात आपल्याला नैनिताल, भीमताल, कौसानी (भारताचे स्वित्झरलंड), चौकोरी, द्वाराहाट आणि पातळभुवनेश्वर पाहायला मिळेल. साधारण ८ दिवस ७ रात्रीच्या ह्या सहली असून बुकिंग ३ महिने आधी करणे आवश्यक आहे. अत्यंत माफक दर आणि उत्तम नियोजन असलेल्या ह्या यात्रांची नोंदणी प्रक्रिया चालू आहे, त्वरित संपर्क करावा: जनसंवाद, सद्गुरू परिवार, इझीटूर्स: +91-9764297684

 

Dev Lok Patal Bhuvaneshwar - The abode of 33 koti Gods

Dev Lok Patal Bhuvaneshwar – The abode of 33 koti Gods

Category: God