सद्गुरूंची मनोभावे सेवा घडो

By | May 24, 2016

सद्गुरूंची मनोभावे सेवा घडो
सुख दू:खातही तो विसर ना पडो || धृ ||

ना मनाची अवस्था ठिकाणावरी
जे नको ते करावेसे वाटे जरी
ऐसे विचार श्रद्धेस नाते नडो || १ ||

सद्गुरूंचे कुशल वर्तमान कळो
तळमळ लागता तेथे पाउल वळो
जीव पंखाविना गुरुठायी उडो || २ ||

गुरुप्रेम वसो रोमरोमंतरी
सौख्य जीवा मिळावे परी नंतरी
माझ्या श्रीगुरुंवर माझे प्रेम जडो || ३ ||

जे मिळे त्यात आनंद मजला असो
त्या आनंदा कुणाची नजर ती नसो
जे हवेते गुरुचरणी सापडो || ४ ||

माझे सर्वस्व आहे गुरूंच्या पदी
सौख्य लाभो गुरूंनाच माझ्या आधी
मधुभजनी गुरु आस ती उलगडो || ५ ||

 

सौजन्य: कु. सुचित्रा अभ्यंकर.