Monthly Archives: March 2015

“एवढे लक्षात ठेवा” – विंदा करंदीकर

“एवढे लक्षात ठेवा”
– विंदा करंदीकर

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥

#copied

नाद करायचा नाही ठाणेकरांचा

एकदा ठाण्याचा एक मुलगा
नाक्यावर सिगरेट  ओढत असतो.
एक कॉलेज ची मुलगी विचारते..?
मुलगी : १ दिवसात किती सिगरेट ओढतोस ?
मुलगा : दिवसातुन नउ दहा वेळा,
मुलगी : एका सिगरेट चे किती रूपये..?
मुलगा : फार नाही एका सिगरेट ल 25 रूपये
दहा सिगरेट चे 250 रूपये फक्त.
मुलगी : कधी पासुनओढतोस.?
मुलगा : 10 वी पासुन,
मुलगी : आज पर्यत सिगरेट ओढन्यासाठी जेवढे
पैसे खर्च केलेस
तेवढ्या पैशात ती समोर दिसते ती CBR
गाडी तुझी असती.
मुलगा :तु सिगरेट ओढतेस ?
मुलगी :नाहि.
मुलगा :मग काय ती CBR तुझी आहे ?
मुलगी :नाहि.
मुलगा : तुझ्या आई….च्या गावात
हा शहानपणा दुसर्याला शिकवायचा,
ती CBR माझीच आहे..
“चल बस मागे येऊर ला जाऊ .
Only ठाणे कर रायडर….! 😎

नाद करायचा नाही ठाणे   करांचा 

एक पाय तळ्यात .. एक पाय मळ्यात … आणि ठाणे  करांचा नाद केला तर हात पाय गळ्यात

Tutorial FTP with FileZilla

What is FTP?

FTP (File Transfer Protocol) is a fast and convenient way to transfer files over the Internet. That is why many webmasters use FTP for uploading their websites files on their hosting accounts. FTP is generally faster than the HTTP protocol.

How do I access FTP?

FTP can be accessed through various FTP clients such as Filezilla, CuteFTP, SmartFTP etc. It can also be accessed through command prompt.

FileZilla

Since this tutorial focuses on FileZilla – let us start with it first by downloading and installing FileZilla. It is not really a tedious process. Please go to https://filezilla-project.org/ to download the latest FileZilla client.

download-filezilla

download-filezilla

 1. Click on where it says Download FileZilla.
 2. 2. Select the appropriate Operating system that you are using. If you don’t know your Operating System then click here
 1. Install FileZilla as per install instructions available on their site.

Post Install

Once FileZilla is installed -Launch FileZilla client and what comes up on screen is this:

FileZilla Main Screen

FileZilla on Desktop

You can either use the Quickconnect option to quickly connect to FTP and get your job done. Refer screen below:

FileZilla Quick Connect Bar.

FileZilla Quick Connect Bar.

In case you are going to be using the FTP site again and again – then it is always advisable to save your FTP configuration using the Site Manager. Click on File + Site Manager OR CTRL+S to open Site Manager.

Once the Site Manager opens you will see the screen below. In this – click on New Site and enter configuration details such as:

Host: Which is the IP Address provided by your service provider for the FTP

FileZilla Sitemanager

FileZilla Sitemanager

 

Protocol: Under this drop down you will see two  options:
1. FTP – File Transfer Protocol
2. SFTP – SSH File Transfer Protocol. (Secure)

Please select FTP

FileZilla - Select FTP

FileZilla – Select FTP

In the next drop down you should see Encryption type:

Please select “Require explicit FTP over TLS”

FileZilla Encryption Type

FileZilla Encryption Type

Please proceed to enter the Username and Password as provided by your service provider.

You can name the account where it says account -it could be named as anything, easy to remember / recall type. And you can enter comments again this could be anything for you to remember.

Site Manager - Account and Comments

Site Manager – Account and Comments

Click on Connect further to proceed to the FTP server.  Once you click on Connect – What you see in the image below is the status log that is provided by FileZilla

FileZilla Connection Status

FileZilla Connection Status

Now on to the main screen. Once connected you should see something like this:

Note:

 1. Marked in Red is your local machine. You can navigate to anywhere you like on your local machine using the address bar provided.
 2. Marked in Blue is the remote server. You can navigate to any location on the remote server using the address bar provided.
 3. Marked in Green is the directory listing of the remote server.
 4. Marked in Black is the directory listing on the Local machine.
  FileZilla SiteManager main

  FileZilla SiteManager main

  Generally you need to navigate to /public_html or /www/ as an alias.

 

Transferring files:

Upload from Local:
As simple as it could get:

Select a file from the local machine, right click and upload!

FileZilla Upload File

FileZilla Upload File

Download from Remote:

FileZilla Upload process

FileZilla Upload process

 

 

 

Shrikrishna

पाहूया श्रीकृष्ण काय म्हणतो.

श्रीकृष्णाची चरित्र कथा सांगते कि तो जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती. त्यातून तो वाचला.
पुढे सतत जीवावर संकटं आली. तो लढत राहिला. काही ना काही युक्ती करून वाचला. प्रसंगी पळसुध्धा काढला.
पण संकटं टाळावीत म्हणून स्वताची कुंडली घेवून त्याने ज्योतिषी गाठला नाही, ना उपास केले. ना अनवाणी पायाने फिरला.. त्याने पुरस्कार केला फक्त कर्मयोगाचा!!

भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली टाकला. तेव्हा कृष्णाने ना अर्जुनाची कुंडली मांडली, ना गंडे-दोरे बांधले. तुझं युद्ध तुलाच कराव लागेल असं त्याने अर्जुनाला ठणकावून सांगितलं.

अर्जुनाने धनुष्य खाली टाकलं तेव्हा श्रीकृष्णाने ते उचलून स्वत अर्जुनातर्फे लढाई केली नाही. श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता. त्याने मनात आणलं असतं तर एकट्याने कौरवांचा पराभव केला असता. पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही. जर अर्जुन लढला तर त्याने अर्जुनाचा सारथ्य करण्याची तयारी दाखवली. एक महान योद्धा driver बनला. अर्जुनाला स्वताची लढाई स्वतालाच करायला लावली.

ह्या कृतीतून संदेश दिला कि जर तुम्ही स्वताचा संघर्ष करायला स्वत सज्ज झालात तर मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुमचा driver बनायला तयार आहे. पण तुम्ही लढायला तयार नसाल तर मी तुमच्या वतीने संघर्ष करणार नाही. तुमच्या पदरात फुकट यश टाकणार नाही.

कोणत्याही देवाचा-देवीचा आशीर्वाद घ्यायला जाल तेव्हा श्रीकृष्णाला विसरू नका.

अनवाणी चालत जायची गरज नाही. उपाशी राहायची गरज नाही… शस्त्र खाली टाकू नका

प्रत्येक व्यक्तीकडे गुणांचं शस्त्र आहे. नेमकं तेच शस्त्र काढा आणि त्याचा उपयोग करून लढा. कोणताही देव-देवी तुमची लढाई लढणार नाही.

तुमची स्वप्न फुकटात पूर्ण करून देणार नाही.
स्वताची लढाई स्वत लढा.

किस्सा

हा किस्सा एकदा वाचाच आणि आवडल्यास शेअर करा…

एक दिवस शिक्षकांनी (ज्यांना स्वताला नास्तिक म्हणून घेणे म्हणजे अभिमान वाटायचा) त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्यास उभे केले.

प्रो. : तर तुझा देवावर विश्वास आहे का?

वि. : हो निश्चितच सर..

प्रो. : देव हा चांगला आहे?

वि. : हो सर

प्रो. : देव हा सर्व शक्तिमान आहे?

वि. : हो सर अर्थातच ..

प्रो. : माझा भाऊ कॅन्सरने वारला त्या आधी त्याने देवाची खुप प्रार्थना केली. आपल्यातला कोणी आजारी असतो तेव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदत केली नाही? का देव चांगला नाही?
(सर्व वर्ग शांत झाला).
कोणीही याचे उत्तर देऊ शकत नाही. बरोबर? ठीक आहे मित्रा मी अजून काही विचारतो.’

प्रोफेसर पुढे बोलू लागले.

प्रो. : राक्षस चांगले आहेत?

वि. : नाही सर ..

प्रो. : कोणी बनवले यांना देवानेच ना.?

वि. : हो सर…

प्रो. : दृष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत?

वि. : नाही सर ..

प्रो. : त्यांनाही देवानेच बनवले. हो ना?

वि. : हो सर…

प्रो. : या जगातील आजारपण,अमानुषता, दु:ख, कुरुपता या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?’

(विद्यार्थी शांत होता) प्रोफेसर पुन्हा म्हणाले.

प्रो. : विज्ञान सांगते तुम्हाला ५ ज्ञानेंद्रीय आहे ज्याने तुम्ही आजूबाजूचे जग समजून घेऊ शकता. सांग मित्रा तु कधी देवाला पाहीलेस?

वि. : नाही सर …

प्रो. : कधी देवाला ऐकलेस? स्पर्श केलास? कधी चव पाहीलीस? अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान आले आहे?

वि. : नाही सर… असे काहीही नाही.

प्रो. : मग निरीक्षणार्थ,परीक्षणार्थी विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की ‘देव’ ही संकल्पना अस्तित्वातच नाही. मग याला तु उत्तर काय देशील?

वि. : मी म्हणेन माझी श्रद्धा आहे.

प्रो. : हो यस, श्रद्धा आणि ईथेच विज्ञानाचे घोडे अडते. माणुस विचार करणे सोडतो. आणि सगळे श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो.

वि. : माफ करा सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारु का?

प्रो. : अवश्य …

वि. : सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? .

प्रो. : हो आहे ना.

वि. : आणि शीतलता?

प्रो. : हो अर्थातच …

वि. : नाही सर.. असे काहीच अस्तित्वात नाही.(वर्गात एकदम पिनड्रॉप शांतता झाली) सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शुन्य डीग्रीच्या ४५८ डीग्री खाली जातो आणि त्या तापमानाला No Heat तापमान म्हणतो. म्हणजेत उष्णतेची कमतरता म्हणजे शीतलता.’

(वर्ग लक्षपुर्वक ऐकत होता)

वि. : अंधाराबद्दल काय मत आहे सर आपले. ते अस्तित्वात आहे?

प्रो. : हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच ना?

वि. : तुम्ही पुन्हा चुकत आहात. आपले तर्कशास्त्र थोडेसे चुकीचे आहे .

प्रो. : कसे काय सिद्ध करुन दाखव.

वि. : जर आपण सृष्टीच्या द्वैततत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात.

विज्ञान हे केवळ डोक्यात येणारे विचारही कसे असतात हे विश्लेशीत करु शकत नाही. ज्या विचारांबद्दल विज्ञान सर्वोच्च नोबेल पारीतोषिक देऊन सन्मान करते. जरा विचित्र नाही वाटत? .

विज्ञान चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करते त्याचा उगमस्त्रोत माहीत नसुनही हे वेडेपणाचे नाही वाटत …

मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही .. फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु.

सर आपण ही गोष्ट मानता का की आपण माकडांचे वंशज आहोत ..

प्रो. : हो मी मानतो ..उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा.

वि. : मला सांगा सर आपण ही उत्क्रांती स्वताच्या डोळ्यांनी पाहीली? नाही. मी ही नाही याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत ….

(सर्व वर्गात हशा पिकला)

सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो .. तुम्ही कधी प्रोफेसर सरांचा मेंदू पाहीलाय … कधी चव घेतलीय कधी स्पर्श केलाय? नाही ना? माफ करा सर मग आम्ही तुम्ही जे शिकवता ते खरे आहे हे आम्ही कसे समजून घेऊ?

प्रो. : Well त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल ..
(आता प्रोफेसर हासत होते. पहील्यांदा त्यांना तोडीस तोड कोणीतरी भेटले)

वि. : एक्झॅक्टली .. सर .. देव आणि माणुस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा …दुर्दैव..म्हणजे श्रद्धेचा आभाव दुसरे काही नाही….

(सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या) पुढे जेव्हा जेव्हा हा विद्यार्थी बोलला तेव्हा तेव्हा त्याने लाखो Minds Ignite केले. करोडो ध्येयवेड्या माणसांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी ‘Wings of Fire’ दिले .. हा विद्यार्थी म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम …

#copied

एक संवाद

एक संवाद,

स्थळ: हनुमान टेकडी, पुणे, आज, निमित्त मोर्निंग वाक

शब्बीर: “का भाऊ मुसलमान माणसांबद्दल एवढा प्रोब्लेम? आता तर आरक्षण पण काढून घेतलं”

रोहन: कुठे प्रोब्लेम? मला का बर प्रोब्लेम असावा? प्रोब्लेम मला मुसलमान समाजाबद्दल नाहीये, प्रोब्लेम मला त्या हलकट राजकीय पक्षांशी आहे जे आप आपल्या सवडी आणि दमडीनुसार मुसलमान माणसाला वापरून घेतात. कॉंग्रेस पासून MIM पर्यंत. मजहब मजहब करून मते खेचायची आणि जातीय तणाव निर्माण करायचा. हमको मुसलमानो को सशक्त करना है – हि थाप प्रत्येक पार्टी देते. आरक्षण देऊन जर सशक्त होणार असेल तर ६० वर्षात बर्याच गोष्टी बद्दल्ल्या असत्या नाही का?

आम्ही बरे, अनआरक्षित, कुठेहि राखीव जागा नाही .. कॉलेज, नोकरी, धंदा, यशस्वी होण्यासाठी .. घाम गळायला लागतो, झक मारत का होईना अभ्यास करावाच लागतो. आज ह्यातल्या कुठल्या गोष्टी मुसलमान माणूस करू शकत नाही का?

शेवटी एक लक्षात ठेवा सर; एक फार हुशार माणूस बोलून गेला:

“You can be deprived of your money, your job and your home by someone else, but remember that no one can ever take away your honor.”

शब्बीर: हा जनाब .. बात मे दम है!

मी: < स्पिच्लेस >

—————————————————————————————-
आरक्षण – सर्व प्रकारचे – रद्द करायची वेळ आलीये, ठेवायचच असेल तर जात,
धर्म ह्या वर आधारित नसून फक्त आर्थिक परिस्तिथी वर आरक्षण ठेवावं.
———————————————————————————-

पैठण, औरंगाबाद – संत एकनाथ

पैठण हे शहर महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असून पूर्वी शालीवाहन राजाची राजधानी म्हणून यांस महत्व होते. राजा रामदेवराय यादवांच्या काळात पैठणला धार्मिक महत्व प्राप्त झालं. दक्षिण काशी म्हणून पैठणला ओळखलं जाऊ लागलं. इ.स. १३१२ च्या सुमारास यादवांचं राज्य संपुष्टात येऊन पैठण मोगलांच्या ताब्यात गेलं. त्याकाळी हजारो हिंदुंना धर्मांतरित करण्यात आलं. स्वातंत्रोत्तर काळापर्यंत पैठण निजामांच्या अधिकार क्षेत्रात होतं. पैठणने जगास अनेक नररत्‍ने दिली असून शून्याचा शोध लावणारे गणितज्ञ भास्कराचार्य, संत भानुदास, संत एकनाथ, कवी मुक्‍तेश्वर, संत गावोबा, निर्णयसिंधुकार भट्टोजी दीक्षित, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट, गानकलेत निष्णात असणारे नाथवंशीय रामचंद्रबुवा, मय्याबुवा, छ्य्याबुवा, काशिनाथबुवा त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण आदींचा त्यात समावेश होतो.

 

सद्यस्थितीत पैठण हे शहर संत एकनाथांच्यामुळे जागतिक नकाशावर आपला ठसा उमटवत असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून याचे महत्व वाढत आहे. प्रतिदिनी नाथांच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या २ ते ३ हजार एवढी असून येथे दर शुद्ध एकादशीस एक लाख भाविक तर वद्य एकादशीस अंदाजे ३० हजार भाविक जमतात. एकनाथषष्ठी हा येथिल मुख्य उत्सव असून या तीन दिवसीय उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ५ ते ६ लाख भविक पैठणमध्ये येतात. येथे अनेक मठ मंदिर असून वारकरी शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी येथे राहतात. संत ज्ञानेश्वर उद्यान, नाथसागर, पैठणी साडी केंद्र इ. मुळे शहरास पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.

 

येथे महाराष्ट्र शासनाने संतपीठाची उभारणी केली आहे. गावातील नाथमंदिर गावातील नाथ मंदिर, पैठण हे श्री एकनाथमहाराजांचे देवघर असून येथील मुख्य मूर्ती श्री विजयी पांडुरंगाची आहे. नाथांची कुलस्वामिनी एकविरा देवीसह अनेक देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. आषाढी वारीसाठी पंढरीस जाणाऱ्या एकनाथ महाराजांच्या पादुका येथेच आहेत. श्रीखंड्‍याने ज्या रांजणात पाणी भरले तो रांजण, ज्यावर चंदन घासले ती सहाण, ज्यात श्रीकृष्ण गुप्त झाले तो उद्धव खांब येथे आहे. नाथमहाराज ज्या खांबास टेकुन प्रवचन करीत तो पुराणखांबही येथेच आहे. भगवान दत्तात्रेयांनी जेथे उभे राहून चोपदारकी केली ते स्थानही येथे दाखविण्यात येते. एकनाथषष्ठी उत्सवातल्या तीनही दिंड्या ह्या ठिकाणाहून निघतात. त्याचप्रमाणे आषाढीचा पालखी सोहळाही या ठिकाणाहून निघतो.

प्रत्येक एकादशीस येथे महापूजा (अभिषेक) करण्यात येते. गोकुळ अष्टमीचा (कृष्ण जन्माष्टमीचा) उत्सव येथे मो

ठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे इतरही पारंपारिक, नैमित्तिक उत्सव येथे साजरे केले जातात. मंदिर परिसरात नाथवंशीयांची घरे आहेत .

 

* कसे याल डांबरी रस्ता / मार्ग :-

०१) औरंगाबाद – बीड कीन – ढोर कीन – पैठण
०२) मुंबई – कल्याण – मुरबाड – आळेफाटा – अहमदनगर – शेवगांव – पैठण
०३) नागपूर – अमरावती – अकोला – मेहकर – जालना – अंबड – पाचोड – पैठण
०४) पुणे – अहमदनगर – शेवगांव – पैठण
०५) पुणे – अहमदनगर – औरंगाबाद – पैठण
०६) कोल्हापूर – कराड – सातारा – पुणे – अहमदनगर – शेवगांव – पैठण
०७) पंढरपूर – कुर्डुवाडी – करमाळा – जामखेड – आष्टी (कडा) पाथर्डी – शेवगांव – पैठण
०८) शिर्डी – राहता – श्रीरामपूर – नेवासाफाटा – शेवगांव – पैठण
०९) शेगांव – खामगाव – बुलडाणा – भोकरदन – सिल्लोड – फुलंब्री – औरंगाबाद – पैठण
१०) नासिक – येवला – वैजापूर – खुलताबाद – औरंगाबाद – पैठण
११) सोलापूर – तुळजापूर – बीड – गेवराई – शहागड / पाचोडा – पैठण
१२) नांदेड – परभणी – पाथरी – माजलगांव – शहागड – पैठण
१३) लातूर – अंबाजोगाई – केज – मांजरसुंबा – बीड – गेवराई – शहागड – पैठण
१४) धुले – चाळिसगांव – कन्नड – औरंगाबाद – पैठण

लोहमार्ग :-
०१) मुंबई – कल्याण – निफाड – मनमाड – औरंगाबाद
०२) हैदराबाद – निजामाबाद – नांदेड – परभणी – सेलू – औरंगाबाद

 

हवाई मार्ग :-
०१) मुंबई – औरंगाबाद
०२) नागपूर – औरंगाबाद
०३) पुणे – औरंगाबाद
०४) दिल्ली – औरंगाबाद

सूचना:-

०१) औरंगाबाद हे शहर लोहमार्ग व हवाईमार्गाच्या दृष्टीने पैठणच्या सर्वात जवळ असून औरंगाबाद – पैठण ही दोन शहरं राज्य महामार्गाने जोडल्या गेलेली आहेत.

०२) येथे निर्देशित केलेल्या मार्गाप्रमाणे प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक लोकांकडून रस्त्याविषयी माहिती घेऊनच प्रवास करा.

गावातील नाथमंदिर समाधी मंदिर नित्योपचार समाधी मंदिर हे एकनाथ महाराजांचे जलसमाधी स्थान आहे. कृष्णकमलातीर्थावर नाथांनी आत्मा ब्रह्मांडात विलीन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर या ठिकाणी अग्निसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी तुळस आणि पिंपळाची रोपं उगवली. तेथेच नाथांचे पुत्र हरिपंडीत महाराजांच्या हस्ते पादुकांची स्थापना करण्यात आली. सद्यस्थितीतील मंदिराचा लाकडी गाभारा हा एकनाथांचे ११ वे वंशज श्रीमंतराजे श्री भानुदास महाराज गोसावी, जहागिरदार यांनी बांधला असून मुख्य तटबंदी ही अहिल्याबाई होळकरांनी बांधली आहे.

नाथंच्या समाधीच्या उजव्या बाजूला त्यांच्या पूर्वजांच्या समाध्या असून डाव्या बाजूस वंशजांच्या समाध्या आहेत. नाथांच्या समाधीच्या मागे प्रदक्षिणा मार्गावर नाथशिष्य उद्धव यांची समाधी आहे तर उत्तर दरवाज्याजवळ दुसरे शिष्य गावोबा यांची समाधी आहे. समाधीस प्रत्येक द्वादशीस महापूजा करण्यात येते. श्रीएकनाथषष्ठीचा महोत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या उत्सवासाठी महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरुन वारकरी लाखोंच्या संख्येनं हजेरी लावतात. पंढरीच्या आषाढी वारीनंतर वारकरी संप्रदायाची दुसऱ्या क्रमांकाची वारी येथे भरते. शिवाय दर शुद्ध एकादशीस येथे वारी भरते त्याहीवेळी हजारो वारकरी नाथसमाधीचं दर्शन घेतात. मंदिरात वीणेचा अखंड पहारा असतो. अखंड हरिनाम सप्ताहाच्या रुपात वारकरी सांप्रदायिक लोक आपली सेवा नाथचरणी रुजू करतात. दररोज हजारो भाविक नाथ समाधीचं दर्शन घेतात.

चमत्कार

१) पितरांस श्राद्धान्न एकदा नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. ब्राह्मणांची वाट पाहत नाथ दारात उभे होते. गिरिजाबाईंचा स्वयंपाक तयार होता. नाथवाडयाबाहेरुन जाणाऱ्या तीन चार हरिजनांस त्या स्वयंपाकाचा सुवास आला. आपल्याला असे अन्न मिळाल्यास किती बरे होईल ही त्यांच्यातील चर्चा नाथांनी ऐकली. ते अन्न हरिजनांस मिळावे असा विचार नाथांच्या मनात उत्पन्न झाला. त्यांनी गिरिजाबाईस ते अन्न हरिजनांस वाटण्यास सांगितले. हरिजनांना श्राद्ध भोजन घातल्याचे पैठणस्थ ब्राह्मणास समजले. नाथांच्या घरी श्राद्धान्न घेण्यास त्यांनी नकार दिला. वास्तविकत: इकडे नाथांनी शुचिर्भूत होऊन गिरिजाबाईं करवी पुन्हा स्वयंपाक करवून घेतला. तथापि ब्राह्मणांनी नकार दिला. श्राद्धविधी वेळेत होणे महत्वाचे होते तेव्हा वाट पाहुन नाथांनी पितृत्रयींच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णु महेश रुपी पितरांस जेवू घातले व आपले श्राद्ध कार्य पूर्ण केले.

२) एकच नाथ दोन ठिकाणी पैठणास राणु नावाचा एक हरिजन गृहस्थ राहत असत. तो व त्याची पत्‍नी नित्य नाथांच्या प्रवचनास येत. त्यांचे आचरण शुद्ध होते. नाथांवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. एकेदिवशी त्यांच्या मनात विचार आला कि आपण नाथांना आपल्या घरी जेवण्यास बोलवावे. त्यांनी नाथांना आमंत्रण दिले ते नाथांनी स्वीकारले. संपूर्ण पैठणभर चर्चेचा एकच विषय कि नाथ हरिजानाकडे जेवणार. ठरलेल्या दिवशी नाथ घरातून बाहेर पडले. काही जण टप्याटप्याने नाथांवर नजर ठेवून होते. नाथ राणूच्या घरी गेले. उभयतांनी नाथांचे मनोभावे पूजन केले. नाथ जेवायला बसले. चमत्कार असा झाला कि, एकाच वेळी लोकांनी नाथांना राणूकडे जेवतांना आणि आपल्या वाडयात प्रवचन सांगताना दिसले. नाथ एकच, वेळ एकच परंतु दोन ठिकाणी दोन भिन्न कार्य हे बघून लोकांनी नाथांचा जयजयकार केला.

#copied

सूर्योदय झाला ..

दाट धुक्याच्या पदरा आडून
रंग गुलाबी आला
अंधाराचे कवच भेदूनी
सूर्योदय झाला ||१||

हळूच वारा झोंबे अंगा
कडकडणारी थंडी
स्वैर मनाला भुरळ घालते
दवबिंदूची धुंदी ||२||

दूर कुठेतरी झाडावरती
किलबिल करती पक्षी
मंद वाहतो पहाट वारा
गंध ठेवूनी वक्षी ||३||

कुठेतरी मग किणकिण करते
घंटा देवाघरची
पसरत येतो गंध धुपाचा
श्रध्दा देवावरची ||४||

उठा मंडळी सकाळ झाली
सांगत आहे सृष्टी
प्रसन्न होवून चला झेलण्या
दयाघनाची वृष्टी ||५||

#copied

Girnaar darshan

Girnar (also known as Girnar Hill or Girinagar or Girnaar or Revatak Pravata) is a collection of mountains in the Junagadh District of Gujarat, India, situated near Junagadh at a distance of 327 km from Ahmedabad. Girnaar mountain ranges are considered to be older than Himalayas and are very sacred. It is one of the most important pilgrimage site for Hindus and Jains. Guru Shikhar at Girnaar is the very place where Guru Dattatreya stayed for 12,000 years and did tapasya.