Monthly Archives: May 2015

गायत्री मंत्रा बद्दल अजून थोडी माहिती!

गायत्री मंत्रा बद्दल अजून थोडी माहिती!

या गायत्री मंत्रामध्ये दहा वेळा ‘ॐ’चा (प्रणवाचा) उच्चार होत असल्याने याला ‘दशप्रणवी गायत्री मंत्र’ असे म्हणतात.

दशप्रणवी गायत्री मंत्र वाईट शक्तींचा त्रास न्यून होण्यासाठी उपयुक्त होऊ शकतो.

गायत्री मंत्राविषयीचे काही नियम

१. गायत्री मंत्र सूर्यास्तानंतर म्हणू नये.
२. मंत्र हे बाणासारखे असतात. मंत्रांचा उच्चार योग्य आणि स्वरांसहित असेल, तरच मंत्र म्हणण्याचा उद्देश साध्य होतो. मंत्र म्हणतांना चुकीचा म्हटल्यास त्यातून निर्माण झालेल्या त्रासदायक (अयोग्य) स्पंदनांमुळे संबंधित व्यक्तीला त्रास होतो; म्हणून वरील गायत्री मंत्र केवळ उपनयन झालेल्यांनी योग्य गुरूंच्या मार्गदर्शनानुसार म्हणावा. सकाळच्या वेळी स्नान झाल्यावर मंत्रपठण केल्यास या मंत्राचा जास्त लाभ होतो.
३. सुवेर आणि सूतक यांच्या कालावधीत मंत्रपठण करू नये.
४. स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये; कारण मंत्रातील तेजतत्त्वामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.
५. हा मंत्र एखाद्याला त्याच्या गुरूंनी उपासना म्हणून म्हणण्यास सांगितला असल्यास गुरूंच्या संकल्पामुळे त्या व्यक्तीला मंत्रातून निर्माण होणार्‍या शक्तीचा त्रास होत नाही.
६. मंत्रपठण करतांना आहार आणि आचार यांचे नियम पाळणे आवश्यक आहे, तरच त्या मंत्राचा योग्य प्रमाणात लाभ होतो. आहार आणि आचार यांचे नियम न पाळल्यास त्यातून निर्माण होणार्‍या दोषांचे निरसन करण्यासाठी मंत्रशक्ती वापरली जाते; त्यामुळे मंत्रपठण करणार्‍यांना अपेक्षित लाभ होत नाही.

ॐ भूः ॐ भुवः ॐ स्वः ॐ महः ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम् ।
ॐ भूर्भुवः स्वः । ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ।
ॐ आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम् ।

अर्थ : सात व्याहृतींचे (सप्तलोकांचे) ॐकारपूर्वक स्मरण करून आम्ही दैदीप्यमान भगवान सविता (सूर्य) देवतेच्या त्या तेजाचे ध्यान करतो. ते (तेज) आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो. आपतत्त्व हे ज्योती (ऊर्जा), रस, अमृत, ब्रह्म, भूलोक, भुवर्लोक , स्वर्गलोक आणि ॐकारस्वरूप आहे.!

ह्या मध्ये भुवर्लोक म्हणजे: भू, भुव:, स्वर्ग, मह:, जन, तप:, सत्य, या सप्तलोकांपैकी दुसरा लोक.

गायत्रीमंत्राबद्दल ..

गायत्रीमंत्राबद्दल लोकांना खूप कुतूहल असते. पण त्याबद्दलची विशेष माहिती नसते. बहुतेकांना ‘ॐ तत्सवितु:’ ही सविता (सूर्य) गायत्री माहिती आहे.

पण अशा एकंदर चोवीस गायत्र्या आहेत असे म्हणतात.
गायत्र्या निरनिराळ्या देवतांच्या निरनिराळ्या असतात. सर्व ठिकाणी एकवाक्यता नाही; पण सविता गायत्री हीच मुख्य मानली जाते. ज्या गायत्र्यांचा लोक साधारणत: जप करतात त्या पुढे दिल्या आहेत.

१. सूर्य गायत्री
ॐ तत्सविर्तुवरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि । धीयोयोन:
प्रचोदयात् ।।

२. विष्णु गायत्री
ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि ।
तन्नो विष्णु: प्रचोदयात् ।।

३. महादेव गायत्री
ॐ तत्पुरुषाय विद्महे महा देवाय धीमहि । तन्नो रुद्र:
प्रचोदयात् ।।

४. गणेश गायत्री
ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि ।
तन्नो दन्ती प्रचोदयात् ।।

५. आदित्य गायत्री
ॐ भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि ।
तन्नो आदित्य प्रचोदयात् ।।

६. श्रीलक्ष्मी गायत्री
ॐ महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि ।
तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ।।

७. पांडुरंग गायत्री
ॐ भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि ।
तन्नो कृष्ण: प्रचोदयात् ।।

८. ब्रह्मा गायत्री
ॐ चतुर्मुखाय विद्महे हंसारूढाय धीमहि । तन्नो ब्रह्म: प्रचोदयात् ।।

९. नृसिंह गायत्री
ॐ नृसिंहाय विद्महे वङ्कानखाय धीमहि ।
तन्नो नृसिह: प्रचोदयात् ।।

१०. कृष्ण गायत्री
ॐ देवकी नंदनाय विद्महे वासुदेवाय धीमहि ।
तन्नो कृष्ण: प्रचोदयात् ।।

११. अग्नी गायत्री
ॐ सप्तजिव्हाय विद्महे अग्निदेवाय धीमहि ।
तन्नो अग्नि: प्रचोदयात् ।।

१२. इंद्र गायत्री
ॐ सहस्रनेत्राय विद्महे वङ्काहस्ताय धीमहि ।
तन्नो इंद्र: प्रचोदयात् ।।

१३. हनुमान गायत्री
ॐ अंजनीसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि ।
तन्नो हनुमंत: प्रचोदयात् ।।

१४. राम गायत्री
ॐ भरताग्रजाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि ।
तन्नो राम: प्रचोदयात् ।।

१५. चन्द्र गायत्री
ॐ क्षीरपुत्राय विद्महे अमृततत्त्वाय धीमहि ।
तन्नो चन्द्र: प्रचोदयात् ।।

१६. यम गायत्री
ॐ सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि ।
तन्नो यम: प्रचोदयात् ।।

१७. वरुण गायत्री
ॐ जलबिम्बाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि ।
तन्नो वरुण: प्रचोदयात् ।।

१८. राधा गायत्री
ॐ वृषभानुजायै विद्महे कृष्णप्रियायै धीमहि ।
तन्नो राधा प्रचोदयात् ।।

१९. दुर्गा गायत्री
ॐ गिरिजायैच विद्महे शिवप्रियायैच धीमहि ।
तन्नो दुर्गा प्रचोदयात् ।।

२०. पृथ्वी गायत्री
ॐ पृथ्वदेव्यै विद्महे सहस्रमत्र्यैच धीमहि ।
तन्नो पृथ्वी प्रचोदयात् ।।

२१. सीता गायत्री
ॐ जनक नन्दिन्यै विद्महे भूमिजायैच धीमहि ।
तन्नो सीता प्रचोदयात् ।।

२२. षण्मुख गायत्री
ॐ षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि ।
तन्नो षण्मुख: प्रचोदयात् ।।

२३. वैश्वानर गायत्री
ॐ पावकाय विद्महे सप्तजिव्हाय धीमहि ।
तन्नो वैश्वानर: प्रचोदयात् ।।

२४. गौरी गायत्री
ॐ सुभागयैच विद्महे काममालिन्यैच धीमहि ।
तन्नो गौरी प्रचोदयात् ।।

देवी गायत्रीची तीन रूपे मानली जातात.सकाळी ती रक्तवर्णी अक्षमाला-कमंडलुधारिणी ब्राह्मी असते. मध्याह्नी ती शङ्ख, चक्र, गदा धारणकारिणी वैष्णवी असते व संध्याकाळी ती वृषभारूढा, शूळ, पाश, नरकपाल धारिणी वृद्ध शिवाणी असते.

शब्द-कल्पद्रुमानुसार एकदा ब्रह्मापत्नी सावित्रीस यज्ञस्थळी प्रवेश नाकारण्यात आला. क्रुद्ध ब्रह्मदेवाने दुसऱ्या स्त्रीसोबत विवाह करून यज्ञ समाप्त करण्याची इच्छा धरिली. त्याच्या इच्छेनुसार वधू शोधन करताना इंद्रास एका गवळ्याची पोर मिळाली. विष्णूच्या सल्ल्यानुसार या मुलीशी ब्रह्मदेवाने गांधर्वविवाह केला. ही मुलगीच गायत्री होय!